या ब्लॉग मध्ये तुमच्या करीत काय आहे?

महाराष्ट्र पोलीस शिपाई चालक भर्ती विडिओ

भारतीय प्रजासत्ताकातील तिसर्‍या क्रमांकाचे राज्य असलेल्या महाराष्ट्रात देशातील सर्वात मोठे पोलिस दल आहे. राज्य संवर्गातील 250 भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी यांच्या व्यतिरीक्त यामध्ये 277 पोलिस अधीक्षक, 652 पोलिस अधीक्षक, 3530 निरीक्षक, 4530 सहाय्यक पोलिस निरीक्षक, 7601 उपनिरीक्षक आणि 1,84,745 पुरुष (कॉन्स्टब्युलरी सदस्य) यांचा समावेश आहे.

मोठ्या शहरी समूह असलेले महाराष्ट्र हे अत्यंत औद्द्योगिक राज्य आहे. मोठ्या शहरांमध्ये पोलिसीकरण करण्यासाठी आयुक्तालय यंत्रणा अवलंबली गेली आहे. राज्यात 10 आयुक्त आणि 36 जिल्हा पोलिस युनिट्स आहेत. महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य ′ सद् रक्षणाय खलिनीकरण ′. याचा अर्थ असा की महाराष्ट्र पोलिस प्रामाणिकपणाचे आणि नियंत्रित करण्यासाठी आणि संसाराच्या अंमलबजावणीसाठी वचनबद्ध आहे. राज्य पोलिस मुख्यालय मुंबई येथे आहे.

भरती विषयी माहिती पुढील प्रमाणे

विभागाचे नावगृह विभाग 
पदांचे नावपोलीस शिपाई चालक
एकूण जागा1019 जागा
वेतनश्रेणी5200 ते 20200 रु. (ग्रेड पे – 2000 रु.) सोबत विशेष वेतन 500 रु. व इतर
अर्ज पद्धतीऑनलाईन
अधिकृत संकेतस्थळmahapolice.gov.in

शैक्षणिक पात्रता

सामान्य 12 वि, डिप्लोमा अभियांत्रिकी (diploma engineering) किंवा शासनाने या परीक्षेस समक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे 
नक्षल ग्रस्त भागातील अर्ज कर्त्यां करीत 7 वि उत्तीर्ण

उपलब्ध जागांची संख्या

पोलीस शिपाई चालक1019

विशेष मागणी

वाहन चालवण्याचा परवानाLMV-TR / LMV

वायो मर्यादा

खुल्या प्रवर्गातील उमेदवार19 ते 28 वर्षापर्यंत आहे
मागासवर्गीय उमेदवार19 ते 33 वर्षापर्यंत आहे

शारीरिक क्षमता

उंची

महिलापुरुष
158 से. मी.  पेक्षा कमी नसावी 165 से. मी.  पेक्षा कमी नसावी 

छाती

महिलापुरुष
न फुगवता 165 से. मी.  पेक्षा कमी नसावी व फुगवून न फुगवता पेक्षा ५ से. मी. जास्त 

नक्षल ग्रस्त भागासाठी छातीच्या मापाची गरज नाही

अनुकंपा तत्त्वावरील भरतीसाठी शिथिलता पुढील प्रमाणे
न फुगवता 2 से. मी. व फुगवून 1.5 से. मी.

लेखी परीक्षा ( 100 गुंण )

जे विद्यार्थी शारीरिक पात्रतेत पात्र ठरतील त्यांची 100 गुंणाची लेखी परीक्षा होईल ती पुढीलप्रमाणे त्याकरिता 90 मिनिटे वेळ दिला जाईल, सर्व प्रश्न पर्यायी स्वरूपाचे असतील व सर्व प्रश्न हे मराठीतून असतील.

विषय गुण
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी20 गुण
बुद्धीमत्ता चाचणी20 गुण
अंकगणित20 गुण
मराठी व्याकरण20 गुण
मोटार वाहन चालविणे / वाहतुकीचे नियम 20 गुण

वाहन चालवण्याची कौशल्य चाचणी

हलके वाहन (LMV) चालवणे 25 गुण 
जीप प्रकारचे वाहन चालवणे 25 गुण 

शारीरिक चाचणी

1. पुरुष

1600 मीटर धावणे 30 गुण
100 मीटर धावणे 10 गुण
गोळा फेक10 गुण
एकूण 50 गुण

2. महिला

800 मीटर धावणे 30 गुण
100 मीटर धावणे 10 गुण
गोळा फेक (4 किलो )10 गुण
एकूण 50 गुण

पुढील परीक्षे करीत पात्र होण्या करीत लागणारे किमान गुण

लेखी चाचणी 35 टक्के 
वाहन चालवणे 40 टक्के

नेहमी विचारल्या जाणारे प्रश्न

पोलीस भर्ती डिप्लोमा इंजिनीरिंग वर दिली जाऊ शकते काय?

हो पोलीस डिप्लोमा इंजिनीरिंग (diploma engineering) वर दिली जाऊ शकते त्याच सोबत १२ वि समतुल्य कुठल्याही परीक्षेवर दिल्या जाऊ शकते.

पोलीस भर्ती करिता वय मर्यादा काय असते?

पोलीस भर्ती करिता वय मर्यादा 19 ते 28 असते परंतु ती परीक्षा आणि वर्गवारी नुसार बदलत जाते

Please visit – what is CMS? Best Cms Platforms in 2020

Please visit – What is Google Analytics? Google Analytics 2020

Please Visit – What is Google Search Console? Google Search Console 2020

Pin It on Pinterest